top of page

Graphology - to understand your kids


" घरात हसरे तारे असता ,

पाहू कशाला नभाकडे"

When there are smiling stars at my home ,

why should I look at the sky..


लहान मुल म्हणजे निरागस हास्य, उत्साह ,आनंद,मस्ती, दंगा,खळखळून हसणं,खेळणं ,मजा ,नाच ,गाणी ,गडबड आणि बडबड...

रंगीबेरंगी खेळणी ,चित्रं ,छान छान गोष्टी आणि बडबडगीते..कित्ती छान असतं मुलांचं आयुष्य..भरभरून उत्साह असतो त्यांच्यामध्ये.. एवढी ऊर्जा असते मुलांमध्ये की घरातल्या सगळ्यांना अगदी पुरून उरतात.

अतिशय कुतूहल असतं त्यांना.. प्रत्येक वस्तू हातात घेऊन बघायची असते, जाणून घ्यायची असते. खेळतात ,धावतात ,धडपडतात आणि परत उठून खेळायला सुरुवात.

मुलं म्हणजे मजा ,मस्ती ,उत्साह आणि मुलं म्हणजे हट्ट ,रूसणं, फुगणं ,कट्टी आणि लगेचच बट्टी सुद्धा..

A child is a bundle of innocence, smile, excitement, joy, fun, fight, cheer, play, dance, music, chaos and babble...

Colorful toys, pictures, stories and rhymes..how amazing is life of the children. They have tremendous enthusiasm. There is so much energy in them that everyone in the house is overwhelmed. They are so very curious .. they want to experience everything with their own hands and feel it. They play, run, stumble, fall and again they get up and start playing. '

Children are like amusement, mischief..., at the same time, they are stubborn, irritable

For them there is enmity for a moment and next minute is friendship...So very unpredictable they are...


अशी ही आपली पिल्लं हळूहळू मोठी व्हायला लागतात आणि आपण मोठी माणसं त्यांच्यावर एक एक अपेक्षा अक्षरशः लादत असतो.मुलं चिडचिडी होतात ,एकलकोंडी ..कुणाशीही बोलेनाशी होतात ,आळशी होतात ,चंचल होतात.. अभ्यास नकोसा वाटतो.

This is how our puppies start to grow slowly and we adults literally impose one expectation over the other on them.

Because of which our children become agitative and lonely. They prefer not to talk to anyone, become lazy, become restless and give up learning at times.


पण असं का..? हे शोधण्याऐवजी आपण मोठी माणसं त्यांना रागावतो ,चिडतो.

पण खरंतर मुलांच्या अशा वागण्यामागे मनात कुठेतरी भीती असते ,दडपण असतं.लहानपणी सारखं ," तू हे करू नकोस आणि ते करू नकोस.. तुला जमणार नाही.. लागेल.. असं नको आणि तसं नको.." असंच सगळं ऐकून मुलं हळूहळू आत्मविश्वास हरवून बसतात.."जाऊ देत ना.. मला नाहीच जमणार.. मग कशाला करू ?" असा विचार करून कामं टाळायला लागतात .म्हणजेच कुठेतरी failure ची भीती वाटायला लागते.

Instead of finding reasons and answering their curiosity, we, grown ups always get angry or scold them for their deeds. In reality, there is fear and oppression somewhere in the mind behind this sudden clumsy behaviour of our children.

We continue to tell our kids, "You don't do this and you don't do that .. You won't get it .. You might get hurt .. Not this and not that .." listening to all of this makes them loose their confidence slowly.

They start thinking, “ leave it, I will not be able to do it, then why should I do it, …. ?

Thinking this they start avoiding work , meaning the fear of Failure gets instilled in their tender minds.


अशी बरीच दडपणं,भीती ,ओझं मनात असतं आणि ते लपविण्यासाठी चिडचिड ,राग ,हट्टीपणा ..अशा defence mechanism चं काटेरी कुंपण मुलं स्वतः भोवती उभं करतात.

मुलांमधली ही भीती नाहीशी झाली की आपोआपच ते काटेरी कुंपण दूर होऊन आपली ती उत्साही ,आनंदी ,चुणचुणीत पिल्लं नव्याने आपल्याला भेटू शकतात.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना.. की ही भीती कसली ते कसं कळणार ?

There is a lot of oppression, fear, burden in their minds. In order to hide it, there comes the irritability, anger, stubbornness..the barbed wire fence of such defence mechanism is built by the children around themselves.

Once the fear among the children will go away , this barbed wire fence will vanish and then we will meet our excited, happy, tiny chicks in a new avatar.

Now you might be wondering .. how do you know what this fear is?


ते मी सांगते....

मुलांच्या handwriting मधनं आपण त्यांना समजून घेऊ शकतो ..त्यांच्याशी जुळवून घेऊ शकतो.

आपल्या सुप्त मनातील विचार आपल्या अक्षरातून स्पष्ट होतात. त्यामुळेच मुलांच्या मनात नक्की काय चाललंय हे त्यांचं अक्षर आपल्याला सांगू शकतं... आहे ना गंमत..😃

कसं ते सांगते...

*Handwriting size वरनं आपलं मुल social आहे की त्याला एकटं राहायला आवडतं हे लक्षात येतं.

* i-dot कसा आहे त्यावरून मुलांचं concentration कसं आहे ते कळतं.

* m,n मुलांची विचार करण्याची क्षमता, निर्णय क्षमता स्पष्ट करतात..

* आणि असं प्रत्येक अक्षरामागे काहीतरी अर्थ आहे.

आणि हे सगळं scientifically सिद्ध झालं आहे.

Let me tell you that..

We can understand them through children's handwriting. We can adapt to them.

The thoughts in your subconscious mind become clear through your letters. That is why their letter can tell you exactly what is going on in the minds of children. Isn’t it fun...

Let me explain a bit.

* Handwriting size shows that your child is social or likes to be alone.

* The i-dot shows how the children are concentrating.

* m, n Explain children's thinking ability, decision making ability.

And all this has been scientifically proven.



माझा मुलगा नचिकेत.. अतिशय हुशार ,एकपाठी ..पण जरा लाजाळू. तो चौथीत असताना मला या Grapho Therapy बद्दल समजलं.

खरंतर अक्षर सुधारणं या एकमेव कारणासाठी क्लास सुरू केला आणि अवघ्या दहा दिवसांतच त्याच्यामधले positive बदल दिसायला लागले.

नचिकेत छान confidently वावरायला लागला.. खुलायला लागला.. त्याच्या मधले सुप्त गुण समोर आले.

हे सगळंच माझ्यासाठी प्रोत्साहन देणारं ठरलं.. मला आवडली ही थेरपी..

आणि आता मी ही Certified Handwriting Analyst & Grapho Therapist झाले आहे.

पुण्यात पिंपरी येथे श्री. प्रदिप क्रिपलानी सर आणि श्वेता गुप्ता ma'am यांच्याकडून मी हे प्रशिक्षण घेतलं आहे.

Let me share my experience,

My son Nachiket has been very intelligent and had great memorising skills.. but was very shy. I learned about Grapho Therapy when he was in fourth std.

In fact, I started the class for the sole reason of improving his handwriting and within just ten days, I began to see positive changes in it.

Nachiket started behaving confidently .. began to open up and share .. the latent qualities in him came to the fore.

All of this was encouraging for me .. I loved this therapy. And now I am a Certified Handwriting Analyst & Grapho Therapist. I have taken this training from Pradip Kripalani sir and Shweta Gupta madam in Pimpri, Pune.


"Aarambh" An initiative to enhance personality..

या नावाने मी मुलांसाठीचे Mind Programming Sessions घेते आहे.

हे mind programming म्हणजे correct pen strokes च्या मदतीने subconscious mind चं reprogramming केलं जातं. हे pen strokes 21 दिवस practice केले की नवीन nuero pathways तयार होतात.

तर आता.. आपल्याला मुलांशी मैत्री करायची आहे.., त्यांच्याशी गप्पा मारा ,त्यांना स्वतंत्र विचार करू द्या, त्यांचं बालपण जपायचं आहे..

आणि हो.. या सगळ्यांत तुम्हाला जर काही मदत लागली तर मी आहेच..😊

This is the name by which I take Mind Programming Sessions for children. This mind programming is the reprogramming of the subconscious mind with the help of correct pen strokes. Practicing these pen strokes for 21 days creates new nuero pathways. So now .. Develop this special bond with your children .., share things with them, let them think independently, and preserve their childhood .. And yes .. if you need any help in all this, I am definitely there..!


347 views0 comments

Recent Posts

See All
bottom of page